एल्गार परिषद हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले वकील सुरेंद्र गडलिंग आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जगताप यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे पुढे ढकलली आहे.
महेश राऊत यांच्या जामीन अर्जाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या याचिकेवरील सुनावणीही न्यायालयाने पुढे ढकलली आहे. महेश राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला होता, मात्र एनआयएने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर या निर्णयाला स्थिगीती देण्यात आली आहे.