गेल्या ११ वर्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात ६ पटींनी वाढ

भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन गेल्या ११ वर्षांमध्ये सहा पटींनी वाढलं असून निर्यात आठ पट वाढली असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमवरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात फक्त ऍपल कंपनीनेच ५ हजार कोटी मूल्याचे मोबाईल फोन निर्यात केले होते असं त्यांनी पुढे म्हटलंय. 

 

या वर्षभरात देशात ४ नवे इलेक्ट्रॉनिक्स कारखाने सुरु होणार आहेत. सध्या या क्षेत्रात २५ लाख  रोजगार उपलब्ध असून काही कंपन्यांची एका कारखान्यात ४० हजार पर्यंत नोकऱ्या देण्याची क्षमता आहे,  असं त्यांनी सांगितलं.