राज्यात प्रथमच वीजग्राहकांना दरकपात मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. वीजदरकपात करण्यासाठी महावितरणनं केलेल्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगानं दिलेल्या निकालानुसार, वीजदरात टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26 टक्के कपात केली जाईल. सुधारित दर येत्या 1 जुलैपासून लागू होतील. पहिल्या वर्षी 10 टक्के कपात होणार आहे. भविष्यातल्या वीज खरेदीत सौर ऊर्जा आणि हरित ऊर्जेवर भर दिल्यामुळे वीजखर्चात बचत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरमहा 10 युनिटपेक्षा कमी वापर करणाऱ्या ग्राहकांना या दरकपातीचा जास्त फायदा होईल, असं सांगून फडणवीस म्हणाले. आजचा दर आहे दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे आणि पाच वर्षात तो दर वाढायच्या ऐवजी दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैशावरनं नऊ रुपये सत्त्याण्णव पैशांपर्यंत खाली येणार आहे कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा सोळा रुपये सत्त्याण्णव पैसे आपला दर होता पंधरा रुपये सत्त्याऐंशी पैशाला खाली जाणार आहे म्हणजे पुढचे पाच वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार आहेत.