बांगलादेशातील निवडणुका राजकीय स्थिती आणि नागरिकांच्या मतानुसार घेतल्या जातील – मुहम्मद युनुस

बांगलादेशातील निवडणुकांचा निर्णय हा राजकीय स्थिती आणि बांगला देशच्या नागरिकांच्या मतानुसार घेतला जाईल, असं बांगला देशातल्या हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनुस यांनी म्हटलं आहे. हे हंगामी सरकार किती दिवस चालेल हेही बांगला देशाच्या नागरिकांच्या मनावरच असल्याचं त्यांनी काल देशाला उद्धेशून केलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रशासन, न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगामधील आवश्यक फेरबदल झाल्यानंतर निर्भय वातावरणात मुक्त निवडणुका घेतल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं. देशात भ्रष्टाचार, लूट आणि हिंसाचाराचा विरोध करणारं सरकार यावं हे निवडणुकाचं उद्दीष्ट असल्याचही ते म्हणाले.