निवडणूकीसंदर्भात नागरिकांच्या शंका आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगानं राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हेल्पलाइन सक्रिय केल्या आहेत. राष्ट्रीय संपर्क केंद्र सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाइन म्हणून काम करेल. ते दररोज सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १८००-११-१९५० या टोल-फ्री क्रमांकाद्वारे कार्यरत राहणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.
Site Admin | October 30, 2025 3:41 PM | Elections | Helpline
निवडणूकीसंदर्भात शंका, तक्रारींचं निराकरण करण्यासाठी हेल्पलाइन सक्रिय