स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे त्यांना निवडणुकांचं प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज साताऱ्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. हे प्रशिक्षण लवकरात लवकर देण्यासाठी मुख्य पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असं त्यांनी सांगितलं.
आपल्या निवडणुका पार पडल्यात, आता होणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे आता नेत्यांनी कार्यकर्ता होत त्यांना निवडून आणावं, असं आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केलं.