डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबईत राजकीय पक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मुंबईत विविध बैठका घेतल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या पथकानं आज सकाळी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी निवडणूक आयोगानं चर्चा केली. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह खात्याचे अतिरीक्त मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. 

त्यानंतर निवडणूक आयोगानं कोकण आणि पुण्याचे विभागीय आयुक्त, कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.