महानगरपालिकेसाठीच्या निवडणुकांची अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होऊन त्यातल्या त्रुटींचं निराकरण होत नाही, तोपर्यंत निवडणुकांची घोषणा होऊ नये, अशी मागणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वार्ताहर परिषदेत केली होती.
महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपा आणि महायुतीनं केलेल्या घोषणा फसव्या आहेत. पागडीमुक्त मुंबई आणि पोलिसांसाठी घरांसंदर्भातल्या योजनांना फसू नका, असं ते म्हणाले.