मतदार यादीत नाव असलेल्यांना मतदान करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र किंवा इतर बारा पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक सादर करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. बिहार विधानसभा निवडणूक तसंच इतर राज्यातल्या पोटनिवडणुकांच्या मतदारसंघात जवळपास सर्व मतदारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. असं आयोगानं सांगितलं आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसांमध्ये सर्व नवीन मतदारांना ओळखपत्रे मिळतील अशी खात्री सगळ्या ठिकाणच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी करुन घ्यावी असे निर्देशही आयोगाने दिले आहेत.
Site Admin | October 10, 2025 1:37 PM | Election Commission | Vote
मतदान करण्यासाठी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक सादर करता येईल – निवडणूक आयोग
