डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधे करणार-ECI

मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधे करणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. मतदारयाद्या अधिक पारदर्शक आणि निर्दोष करणं हे याचं उद्दिष्ट आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. दुसऱ्या टप्प्यात सखोल पुनरीक्षण टप्प्याटप्प्याने राबवलं जाईल, असं ज्ञानेश कुमार म्हणाले. एकही मतदार यादीतून वगळला जाऊ नये आणि चुकीची व्यक्ती यादीत समाविष्ट होऊ नये ही मतदार नोंदणी अधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं.