भारत निवडणूक आयोगाने BLO म्हणजे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचं वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसंच बीएलओ पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ERO अर्थात मतदार नोंदणी अधिकारी आणि AERO म्हणजेजान सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे.अचूक आणि पारदर्शक मतदार यादी ही लोकशाहीचा भक्कम आधार आहे.
त्यामुळे मतदार यादी तयार करण्यासाठी तसंच तिच्या पुनरावलोकनासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याकरिता निवडणूक आयोगानं हे पाऊल उचललं आहे.
या नव्या तरतुदीनुसार बीएलओचे मानधन ६ हजार रुपयांवरून १२ हजार तर मतदार यादी पुनरावलोकनासाठी बीएलओ प्रोत्साहन रक्कम एक हजारावरून २ हजार करण्यात आली आहे. तसंच बीएलओ पर्यवेक्षकांना १२ हजार ऐवजी १८ हजार रुपये देम्यात येतील.
एईआरओ यांना प्रथमच २५ हजार तर ईआरओ यांनाही प्रथमच ३० हजार रुपये मानधन देण्यात येईल.
याशिवाय, बिहारपासून सुरू झालेल्या या विशेष तीव्र पुनरावलोकन मोहिमेसाठी बीएलओंना ६ रुपयांचं विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येणार आहे.