डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ECI ची नवी दिल्लीत मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु

भारतीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीमध्ये मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीमधल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ पातळीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिल्ली मुख्य निवडणूक अधीकारी कार्यालयानं दिली. 

 

नवी दिल्लीत २००२ साली राबवलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमानंतर अद्ययावत करण्यात आलेल्या मतदार याद्या दिल्ली सीईओच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या असून, नागरिकांनी त्यामध्ये आपल्या नावाची पडताळणी करावी, असं आवाहन दिल्ली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे.