मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. योसोबतच प्रचारासाठीची मर्यादा देखील नव्यानं निश्चित केली असून, मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आतमध्ये प्रचार करायला मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना अनौपचारिक ओळखपत्र देण्यासाठी ठेवलेले मदत बूथ आता मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या पलीकडे ठेवावे लागणार आहेत.
Site Admin | May 24, 2025 3:55 PM | Election Commission of India
मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा देणार – ECI
