४८ तासांच्या आत मतदानाची बूथनिहाय आकडेवारी जाहीर करायला निवडणूक आयोग तयार

लोकसभेसाठी किंवा एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदानाची आकडेवारी प्रत्येक बूथनुसार आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर  करावी, या मागणीचा विचार करायला आपण तयार आहोत, असं निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी आयोगासमोर येत्या १० दिवसांत सादरीकरण करावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. तृणमूल काँग्रेसच्या  खासदार महुआ मोईत्रा आणि एका सेवाभावी संस्थेनं यासंदर्भात दोन जनहित याचिका दाखल केल्या होत्या. यापुढची सुनावणी आता जुलै महिन्यात होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.