January 24, 2026 3:26 PM | Election Commission

printer

बूथ स्तरीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश

भारतीय निवडणूक आयोगानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बूथ स्तरीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्तव्यात कसूर, हलगर्जीपणा, गैरवर्तन, आपल्या सूचनांचं जाणूनबुजून पालन न करणं किंवा लोकप्रतिनिधी कायदा आणि मतदार नोंदणी नियमांच्या तरतुदींचं उल्लंघन यासारख्या प्रकरणांमध्ये निलंबनासह कठोर कारवाई केली जाईल, असं आयोगानं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. गुन्हेगारी स्वरुपाच्या गैरवर्तनाचे प्रकार आढळल्यास एफआयआरही नोंदवला जाऊ शकतो असंही आयोगानं म्हटलं आहे.