केरळमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण उपक्रमाच्या वेळापत्रकात एका आठवड्याने वाढ

निवडणूक आयोगाने केरळमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण उपक्रमाच्या वेळापत्रकात एका आठवड्याने वाढ केली आहे. 11 डिसेंबर रोजी संपणारा मतदार गणनेचा टप्पा आता 18 डिसेंबरपर्यंत सुरू राहील, अशी माहिती आयोगाने काल दिली. सुधारित वेळापत्रकानुसार, मसुदा मतदार यादी 16 डिसेंबरऐवजी 23 डिसेंबर रोजी प्रकाशित केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने मतदार यादी पुर्नरिक्षण कार्यक्रमासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.