निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करीत असल्याचा आरोप करुन, इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर मोर्चा काढला.
बिहारमधलं मतदारयाद्या पुनरिक्षण रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. पोलिसांनी मोर्चा अडवला तेव्हा आंदोलनकर्त्या खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदार मोर्चात सहभागी झाले होते.