निवडणूक आयोगातर्फे बूथ पातळीवरच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन

निवडणूक आयोगातर्फे बूथ पातळीवरच्या एक लाख अधिकाऱ्यांसाठी प्रथमच प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी यांच्या हस्ते झालं. बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तमिळनाडूमधल्या १३ जिलह्यांमधले निवडणूक नोंदणी अधिकारी आणि  निवडणूक अधिकारी यांच्यासह १०० हून जास्त बूथ पातळीवरचे अधिकारी या टप्प्यात प्रशिक्षण घेणार आहेत.