डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 30, 2024 12:12 PM | Assembly Elections

printer

राज्यभरात २८८ मतदार संघांसाठी ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल

महाराष्ट्रातल्या २८८ विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या आणि अपक्ष अशा ७ हजार ९९५ उमेदवारांनी दहा हजार ९०५ अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी आज होणार असून चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, शेवटच्या दिवशीही अनेक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील.