सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आधार कार्ड हे 12 वे कागदपत्र म्हणून गृहीत धरण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे बिहारमधील सुधारित मतदार यादीत तिथल्या मतदारांना आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून सादर करता येणार आहे.
म्हणजेच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड हा एक स्वतंत्र पुरावा म्हणून सादर करता येईल. तथापि, आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.