रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती

रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केंद्र सरकारनं केली आहे. सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्यानंतर ११ डिसेंबरला संजय मल्होत्रा पदभार स्वीकारतील. त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ मिळेल. १९९०च्या राजस्थान कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असलेले संजय मल्होत्रा सध्या अर्थमंत्रालयात महसूल सचिव पदावर काम करत आहेत.