January 8, 2026 8:18 PM

printer

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्षांचा प्रचार जोमाने सुरु

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसाठीचा प्रचार जोमाने सुरु आहे. विविध ठिकाणचे प्रश्न लक्षात घेऊन वेगवेगळे राजकीय पक्ष निवडणूक जहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. संबंधित महानगरपालिकांमधे  येत्या १५ जानेवारीला मतदान असल्याने संबंधित क्षेत्रात  सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे.

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज भाजपाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. पुढच्या वीस वर्षांत पाणी आणि मालमत्ता करात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असं आश्वासन त्यात दिलं आहे.

 

‘कुंभ पर्वातली अमृत वचन’ या नावाने भाजपानं नाशिक महापालिकेसाठीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. नाशिकला ग्रीन एनर्जी, सोलर उपक्रम, स्मार्ट डेटा-सिस्टम, ई-गव्हर्नन्स, क्लीन टेक्नॉलॉजी आणि हरित पायाभूत सुविधा देण्याचं आश्वासन त्यात आहे.