येत्या १५ तारखेला होणाऱ्या वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी हॉटेल बिलांमध्ये तसंच रिक्षा भाडं आणि बस तिकीटांवर विशेष सवलत देण्याची योजना आखली आहे. यासंदर्भात पालिकेने एक अधिकृत पत्रक जारी केलं आहे.
त्यामुळे आता वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांना हॉटेल बिलावर १५ टक्के सवलत तर रिक्षाच्या भाड्यात ५० टक्के सूट मिळणार आहे. महानगरपालिका परिवहन विभागाने मतदारांसाठी बस भाड्यात विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.