महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढवण्याचा महायुतीचा निर्धार

आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते.

 

आगामी निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपली बैठक झाली, यात एकत्र लढण्याविषयी एकमत झाल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. जागावाटप स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ठरवलं जाईल, असं ते म्हणाले