डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 18, 2025 3:37 PM

printer

नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल अर्जांची आज छाननी

नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी आज होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या सदस्यपदासाठी एकूण एक हजार ३१० अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी ८९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

 

सोलापूर जिल्ह्यात ११ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायत निवडणुकांसाठी  नगराध्यक्षपदांसाठी १४६ तर  २८९ सदस्यपदांसाठी २ हजार २६१ उमेदवारी  अर्ज आले.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतीतल्या अध्यक्षपदासाठी ३१  तर सदस्यपदांसाठी ३५९  नामनिर्देशन पत्रं दाखल झाली आहेत. 

 

रायगड जिल्ह्यातल्या दहा नगरपालिकांमधल्या एकूण दहा अध्यक्षपदांसाठी ५९ तर २१७ सदस्यपदांसाठी ९०० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज केले आहेत.

 

वाशिम जिल्ह्या ४ नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत यांच्या सदस्यपदांसाठी  ८३ तर सदस्यपदांसाठी १ हजार ६३ नामनिर्देशनपत्र दाखल  झाली. 

 

परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी एकूण ११७ तर नगरसेवक पदासाठी १ हजार २१० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रं दाखल केली आहेत.

 

नांदेड जिल्ह्यातल्या १२ नगरपरिषदा आणि  एक नगरपंचायत यांच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी २१२ तर सदस्यपदांसाठी २ हजार १५३ उमेदवारी अर्ज आले आहेत.

 

वाशीम जिल्ह्यातल्या नगरपरिषद – नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकांमध्ये  अध्यक्षपदासाठी एकूण ८३ तर सदस्यपदांसाठी १ हजार ६३ नामनिर्देशनपत्र दाखल  

 

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतीमध्ये अध्यक्षपदांसाठी एकूण ५६ उमेदवारी तसंच, एकूण १५१ सदस्यपदांसाठी ६३५ अर्ज दाखल झाले आहेत. 

 

जालना जिल्हयातल्या भोकरदन परतूर आणि अंबड या नगरपरिषदांतील अध्यक्षपदांसाठी कालपर्यंत  एकूण ४२ तर सदस्यपदांसाठी ४१८ उमेदवारी अर्ज आले. 

 

लातूर जिल्ह्यातल्या ४ नगर परिषदा आणि एक नगरपंचायत यामध्ये अध्यक्षपदांसाठी १०३ तर सदस्यपदांसाठी १ हजार २५७ जणांचे उमेदवारी अर्ज आले आहेत.

 

नंदुरबार जिल्ह्यातल्या चार नगर परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी ४९ अर्ज तर नगरसेवकपदांसाठी ७२६  उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.