नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या, रविवारी देखील उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष भरता येतील तसंच ऑनलाईनही दाखल करता येणार आहेेत, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. १७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करायची अंतिम मुदत आहे.
दरम्यान, रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज १७ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. शिवसेनेकडून ९, भाजपा ५, प्रहार जनशक्ती पक्षाकडून एका आणि दोन अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज सादर केले. रत्नागिरी नगरपरिषदेत महायुतीचा नगराध्यक्ष १२ ते १४ हजार मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.