डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. बहुमत मिळवणाऱ्या आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विधिमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड एकमताने झाली.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड झाली. भाजपा विधिमंडळ पक्षाची नेता निवड अद्याप बाकी आहे. ती झाल्यावर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय होईल, असं अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथं सांगितलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपप्रधानमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळावर त्यांनी आदरांजली वाहिली.