महायुती सरकार विदर्भाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध – एकनाश शिंदे

वीजनिर्मिती, खनिजसंपत्ती, कृषी, वनसंपत्ती, पर्यटन, वाहतूक आणि लॉजिस्टिक ही विदर्भाची सात मुख्य बलस्थानं असून महायुती सरकार विदर्भाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे म्हणाले. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर देताना ते विधानपरिषदेत  बोलत होते. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागाचं रूपांतर देशाच्या स्टील हबमध्ये करण्याचा आणि मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दावोसमध्ये झालेल्या करारांपैकी तब्बल ५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केवळ विदर्भासाठी करण्यात आले असून, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी तसंच घरांच्या किमती कमी होण्यासाठी सरकार राबवणार असल्याच्या योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.