महाराष्ट्रातले सुमारे दीडशे पर्यटक नेपाळमधे अडकले असून त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिंदे यांनी या पर्यटकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्य सरकार भारतीय दूतावासाशी बोलून नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी सतत संपर्कात आहे, असं राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी वार्ताहरांना सांगितलं. उद्यापर्यंत नेपाळ-भारत विमान सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे, त्यानंतर पर्यटकांना परत आणायला सुरुवात होईल.