November 17, 2024 11:11 AM

printer

एक पेड माँ के नाम या उपक्रमामध्ये सहभागी होऊन त्याला गती देणाऱ्या सर्वांचे प्रधानमंत्र्यांनी मानले आभार

एक पेड माँ के नाम या उपक्रमामध्ये सहभागी होऊन त्याला गती देणाऱ्या सर्वांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. जास्तीत जास्त लोकानी त्यांच्या आईच्या सन्मानार्थ एक झाड लावावं आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान द्यावं असं आवाहन एका समाज माध्यमावरील संदेशात मोदींनी केलं आहे.