डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गेल्या ११ वर्षात प्रत्येक अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रासाठी केलेल्या तरतूदीत वाढ-धर्मेन्द्र प्रधान

गेल्या ११ वर्षात प्रत्येक अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रासाठी केलेली तरतूद वाढवत नेल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांनी म्हटलं आहे. शिक्षण मंत्रालयाच्या संदर्भातल्या चर्चेला उत्तर देताना ते आज राज्यसभेत बोलत होते. शिक्षणक्षेत्राप्रती सरकारची वचनबद्धता यावरून सिद्ध होते असं ते म्हणाले. शिक्षणमंत्रालयासोबत महिला आणि बालकल्याण मंत्रालय तसंच आरोग्य मंत्रालयांच्या संयुक्त प्रयत्नांमधून सर्वंकष बालशिक्षण, पोषण आणि विकास साधला जात असल्याचं ते म्हणाले. 

 

याआधी काँग्रेस खासदार दिग्विजय सिंग यांनी शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थी संशोधकांना जुनियर रिसर्च  फेलोशिप मिळण्यात होत असलेल्या विलंबाचा मुद्दा उपस्थित केला होता. सरकार विद्यापीठांकडून वस्तू आणि सेवा कर घेत असल्याचं त्यांनी निदर्शनाला आणलं. 

 

देशभरातल्या साडेचौदा हजार शाळांचं आधुनिकीकरण सुरु असून समग्र शिक्षण अभियानासाठी सरकारने ४१ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं भाजप खासदार घनश्याम तिवारी यांनी नमूद केलं.