व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण विद्यार्थिनींसाठी मोफत असल्यानं त्यासाठी कोणतंही शुल्क आकारू नये, असे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. विद्यार्थिनींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं आज बैठक झाली. यात मंत्री पाटील यांनी हे आदेश दिले. गेल्यावर्षी संस्थांनी शुल्क आकारलं असेल तर ते परत करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या. शुल्क आकारणीबाबतच्या समस्यांच्या निवारणासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने मदतक्रमांक जाहीर केला आहे. यासाठी विशेष नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचं पाटील यांनी सांगितलं.
Site Admin | June 22, 2025 7:12 PM | Education | Female Students | Maharashtra | Minister Chandrakant Patil
व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण विद्यार्थिनींसाठी मोफत
