काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाडरा यांच्या हरियाणातल्या जमीन घोटाळ्यातल्या सहभागाबद्दल सक्तवसुली संचालनालयामार्फत सध्या चौकशी सुरु आहे. वाडरा यांच्या कंपनीने गुरुग्राम इथं केलेल्या जमीन खरेदीचा या खटल्याशी संबंध आहे. नवी दिल्लीतल्या संचालनालयाच्या कार्यालयात वाडरा आज सकाळी चौकशीसाठी हजर झाले होते.
राजस्थानचे माजी मंत्री प्रताप सिंग खचारियावस यांच्या घरासह १५ ठिकाणी आज सक्तवसुली संचालनालयाने छापे टाकले . मेसर्स पी ए सी एल शी संबंधित ४८ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याबद्दल सुरु असलेल्या चौकशीसंदर्भात हे छापे टाकले होते. कंपनीची मालमत्ता बेकायदेशीर रित्या विकल्याच्या आरोपावरून दिवंगत निर्मल सिंग भानगू यांच्या सहकाऱ्यांवर एफआयआर दाखल केले आहेत.
Site Admin | April 15, 2025 2:49 PM | ईडी | पीएसीएल घोटाळा
४८ हजार कोटी रुपयांच्या पीएसीएल घोटाळ्याबद्दल, ईडीचे १५ हून अधिक ठिकाणी छापे
