उद्योजक अनिल अंबानी यांच्या मालकीच्या काही इमारती जप्त

ईडीच्या विशेष कृती दलानं उद्योजक अनिल अंबानी यांच्या मालकीच्या काही इमारती जप्त केल्या आहेत. नवी मुंबईतल्या धीरुभाई अंबानी नॉलेज सिटी आणि मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये या इमारती आहेत. याशिवाय पुणे, चेन्नई, भुवनेश्वरमधल्याही काही इमारती आणि मोकळ्या जागा ईडीनं जप्त केल्या आहेत. या सर्व मालमत्तांची एकत्रित किंमत सुमारे चौदाशे कोटी रुपये आहे. विविध बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई झाली असून आतापर्यंत त्यांचजी सुमारे ९ हजार कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे.