January 25, 2025 2:58 PM | ED

printer

ED : मुंबई आणि जयपूरमध्ये मिळून १३ ठिकाणी छापे

अवैध आर्थिक व्यवहार प्रतिबंध कायद्या अंतर्गत सक्तवसुली संचलनालयानं मुंबई आणि जयपूर मध्ये  मिळून १३ ठिकाणी छापे टाकले. प्लॅटिनम हर्न या खाजगी कंपनीमार्फत राबवल्या जाणाऱ्या फसव्या गुंतवणूक योजना उघडकीस आल्यामुळे हे छापे टाकण्यात आले. कंपनीनं दागदागिने आणि रत्नांच्या गुंतवणुकीवर दोन ते नऊ टक्के साप्ताहिक परतावा देण्याचं आश्वासन देऊन गुंतवणुकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप असून संबंधित बँक खात्यातले २१ कोटी ७५ लाख रुपये गोठवले गेले आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.