सक्तवसुली संचालनालयानं आज दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अल फलाह समूहाशी संबंधित २५ ठिकाणी शोधमोहिमा राबवल्या. आर्थिक अनियमितता, बनावट कंपन्यांचा वापर यासह इतर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
सध्या अल फलाह समूहाशी संबंधित असलेल्या आणि एकाच पत्त्यावर नोंद असलेल्या नऊ बनावट कंपन्यांचा तपास सुरू असल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयानं दिली.
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटानंतर अटक करण्यात आलेल्या अनेक डॉक्टरांचा अल फलाह विद्यापीठाशी संबंध असल्याचं समोर आल्यानंतर या कारवाईला वेग आला आहे.