विविध समाज माध्यमांवर बेकायदा सट्टेबाजी करणाऱ्या ॲपची जाहिरात केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज अभिनेता प्रकाश राज, राणा दुग्गुबाती, विजय देवरकोंडा यांच्यासह अनेकजणांना चौकशीसाठी समन्स पाठवलं.
राणा दुग्गुबाती याला २३ जुलैला.प्रकाश राज यांना ३० जुलैला, विजय देवरकोंडाला ६ ऑगस्टला तर लक्ष्मी मांचू ला १२ ऑगस्टला चौकशीसाठी बोलवलं आहे. अवैधरित्या सट्टेबाजी करणाऱ्या अॅप विरोधात तसंच त्यांची जाहिरात करणाऱ्यांविरोधात ईडीनं गुन्हे दाखल करत कठोर कारवाई सुरू केली आहे.