डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 8, 2025 3:12 PM | ED

printer

ED चे गैरव्यवहार प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या ९ ठिकाणी छापे

सक्त वसुली संचालनालयानं ८०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणांमध्ये बनावट जीएसटी इनव्हॉइसशी संबधित चौकशीसाठी कलकत्ता, रांची आणि जमशेदपूर इथल्या नऊ ठिकाणी छापे टाकले आहेत. अंदाजे १४ हजार ३२५ कोटी रूपयांचे बनावट इनव्हॉइस तयार केल्यामुळं आठशे कोटी रूपयांपेक्षा जास्त इनपुट टॅक्स क्रेडिटचे दावे अपात्र ठरल्याची माहिती संचालन विभागानं दिली आहे.

 

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेशी संबधित कागदपत्रं आणि मालमत्ता उघड करणं हे या कारवाईचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी निवेदनातून म्हटलं आहे.