April 15, 2025 8:15 PM | ED

printer

राजस्थानचे माजी मंत्री प्रताप सिंह खचरियावास यांच्यावर ईडीची कारवाई

राजस्थान राज्य सरकारमधले माजी मंत्री प्रताप सिंह खचरियावास यांच्या निवासस्थानासह इतर १५ ठिकाणी आज सक्त वसुली संचालनालयाने छापे टाकले. PACL शी संबंधित ४८ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी तपास करण्यासाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. कंपनीच्या मालमत्तेची बेकायदेशीर विल्हेवाट लावल्याबद्दल दिवंगत निर्मल सिंह भांगु यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.