March 18, 2025 8:46 PM

printer

ईडीचे बेंगळुरू इथल्या ८ ठिकाणांवर छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने बेंगळुरू इथल्या आठ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सोरोस इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फंड आणि ओपन सोसायटी फाउंडेशन या गैरसरकारी संस्थांनी परकीय चलनात केलेल्या अफरातफरीच्या आरोपावरून ही छापेमारी करण्यात आली.

 

परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून २०१६मध्ये गृहमंत्रालयाने सोरोस यासंस्थेला अनियमित परकीय देणग्या स्वीकारण्यापासून प्रतिबंध केला होता. पण, आपल्या काही अन्य संस्थांच्या माध्यमातून थेट परकीय गुंतवणुकीच्या स्वरुपात सोरोसने निधी मिळवला होता, असा आरोप ईडीने केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.