डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 6, 2025 2:59 PM | ED

printer

ईडीचे देशभरात ठिकठिकाणी छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज देशभरात ठिकठिकाणी छापे टाकले. ठाणे, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता, तिरुवनंतपुरम, मलप्पुरम, नंदयाल, पाकुर, लखनऊ आणि जयपूर या ठिकाणांचा यात समावेश आहे. पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या राजकीय संघटनेच्या चौकशीचा एक भाग म्हणून ही छापेमारी करण्यात आली.

 

सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दोन्ही संघटनांनी संगनमतानं अनेक गुन्हेगारी कारस्थानं केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून केंद्र सरकारनं २०२२ मध्ये पीएफआय या संघटनेवर बंदी घातली होती. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटननेवर पीएफआयची राजकीय संघटना असल्याचा आरोप करण्यात आला आहे.