डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 19, 2024 8:24 PM | Ecuador - Emergency

printer

इक्वेडोर या देशानं जंगलातले वणवे, पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी ६० दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित

दक्षिण अमेरिकेतल्या इक्वेडोर या देशानं जंगलातले वणवे, पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी ६० दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. या प्रांतात जंगलात सध्या  १७ विविध  ठिकाणी वणवे पेटलेले असून ५ ठिकाणी आग नियंत्रणात आली आहे, अशी माहिती  इक्वेडोरचे ऊर्जामंत्री इनेस  मांझानो यांनी दिली आहे.अझूये आणि लोजा  प्रांतांना याचा सर्वाधिक फटका बसला असून दुष्काळामुळे मोठ्या ऊर्जासंकटाचा सामना इक्वेडोरला करावा लागतोय.  

मागच्या सप्टेंबर  महिन्यापासून  सरकारला नाईलाजानं  वीजकपात करावी लागत आहे.