December 22, 2025 6:23 PM

printer

अर्थव्यवस्थेसंबंधीची आकडेवारीसाठीचं आधारवर्ष बदलून नवीन आकडेवारी जाहीर करणार

अर्थव्यवस्थेसंबंधीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यासाठीचं आधारवर्ष बदलून सरकार आता नवीन संदर्भानुसार आकडेवारी जाहीर करणार आहे.  केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की किरकोळ चलनफुगवट्याचा दर १२ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल आणि त्याकरता आधारवर्ष २०२४ असेल. राष्ट्रीय लेखापरीक्षणाशी संबंधित आकडेवारीसाठी, तसंच औद्योगिक उत्पादन निर्देशांक मोजण्यासाठी २०२२- २३ हे आधारवर्ष असेल  स्थूल राष्ट्रीय उत्पादन- जीडीपी, आणि इतर निर्देशांक ठरवताना  मे २०२६ पासून नवीन आधारवर्ष असेल. या बदलाच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी उद्या नवी दिल्लीत एक कार्यशाळा होणार असून नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन आणि इतर वरिष्ठ अधिकारी त्यात भाग घेतील. अशी कार्यशाळा मुंबईत गेल्या २६ नोव्हेंबरला झाली.