आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात श्रीलंकेनं केलेल्या कामगिरीचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं कौतुक केलं आहे. मोठ्या आर्थिक संकटाचा सामना केल्यानंतर आता त्यातून बाहेर पडण्याचा मार्गावर श्रीलंकेची सुरू असलेली वाटचाल ठाम असल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात श्रीलंकेचा आर्थिक वृद्धी दर ५ टक्के होता आणि चालू आर्थिक ४ पूर्णांक २ दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे. यातून अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर स्थिरावत असल्याचं स्पष्ट होतंय, असं नाणेनिधीचे आशिया प्रशांत क्षेत्राचे संचालक कृष्णा श्रीनिवास म्हणाले. चालू आर्थिक वर्षातल्या कर संकलनाच्या लक्ष्यापैकी ७५ टक्के पूर्ण झाल्याची माहिती श्रीलंकेच्या महसूल खात्यानं दिली आहे.