बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षण मोहिमे अंतर्गत तयार केलेली प्रारूप मतदार यादी आज निवडणूक आयोग प्रकाशित करणार आहेत. बिहारमधील सर्व 38 जिल्ह्यांमधील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मतदार यादीची प्रत्यक्ष आणि डिजीटल प्रत देण्यात येईल असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी, 243 निवडणूक अधिकारी तसंच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप आक्षेप नोंदवता येतील. आजपासून 1 सप्टेंबरपर्यंतच्या महिन्याभराच्या काळात हे आक्षेप नोंदवता येणार असल्याचं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं.
Site Admin | August 1, 2025 9:57 AM | Bihar | ECISVEEP
निवडणूक आयोग बिहारमध्ये तयार केलेली प्रारूप मतदार यादी प्रकाशित करणार
