October 7, 2025 2:24 PM | ECI | sir

printer

मतदार याद्यांचं सखोल पुनरिक्षण देशभरात करण्यात येणार

मतदार यांद्यांच्या सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया देशभरात राबवण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केलं.  ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. देशभरात मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण करण्यासाठी निवडणूक आयोग तयारी करत असून याच्या तारखा निश्चित करून लवकर याची घोषणा करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.  निवडणूक आयोगाने बिहारमधे सखोल पुनरिक्षणाची प्रक्रिया नुकतीच केली, यात ६९ लाख जणांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं. त्यानंतर बिहारमधे मतदारांची संख्या ७ कोटी ४३ लाख इतकी असल्याचं स्पष्ट झालं. मतदार यादी अधिक पारदर्शक करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्य आयुक्तांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.