काँग्रेसचे नेते आणि केंद्रातले विरोधी पक्षनेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा केलेला आरोप, भारत निवडणूक आयोगानं फेटाळला आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया विकेंद्रित पद्धतीनं आणि आणि संसदेनं मंजूर केलेल्या निवडणूक कायद्यांनुसार पार पडल्याचं आयोगानं म्हटलं आहे.
आयोगानं या मुद्यावर राहुल गांधी यांना त्यांच्या सोयीच्या दिवशी आणि वेळेवर चर्चा करण्यासाठी आमंत्रितही केलं आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा, महाराष्ट्रात अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत मतदारसंख्या आठ टक्क्यानं वाढल्याचं म्हणत, निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.