भारत निवडणूक आयोगाने आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाचा आज प्रारंभ केला. या कार्यक्रमाअंतर्गत ७ देशांमधून आलेले १४ प्रतिनिधी येत्या ५ आणि ६ नोव्हेंबरला बिहारला भेट देऊन, विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचं निरीक्षण करणार आहेत.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांनी आज नवी दिल्ली इथं या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना भारतीय निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली गेली, तसंच इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्राचं प्रात्यक्षिकही दाखवलं गेलं.