देशातल्या सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची दोन दिवसांच्या परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. या परिषदेला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त सुखबिर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांंनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी देशभरात होणाऱ्या मतदार याद्या पुनरावलोकनाच्या तयारीचा तसेच याआधीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांच्या बाबतीत झालेल्या प्रगतीचा आढावाही यावेळी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला.
Site Admin | October 26, 2025 7:41 PM | ECI
देशातल्या सर्व प्रदेशातल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेला सुरुवात