केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या मिळून पाच विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली. याविषयीची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. पुढच्या महिन्यात २ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, ३ जून रोजी त्यांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ५ जून असून १९ जून रोजी मतदान तर २३ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
गुजरातमध्ये २, तर उर्वरित राज्यांमधल्या प्रत्येकी एका मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.